Tuesday, January 12, 2010

मराठी असणे म्हणजे नेमके काय असणे ह्या गुंतागुंतीच्या विषयावर संध्याकाळी केलेले काही विसखळीत विचार- सचिन केतकर

मराठी असंणे म्हणजे
मराठीत असणे


मराठी असणे म्हणजे शेतावर मराठी बुजगावणे लावणे
मराठी असणे म्हणजे बुजगावण्यांचीच शेती करणे
मराठी असणे म्हणजे मराठीत आत्मह्त्या करणे


मराठी असणे म्हणजे सातशे वर्ष जुन्या 
अनार्य गर्भाशयातून खडकाळ दरीत जन्मणे  


मराठी असणे म्हणजे मराठीत जगणे मराठीत हगणे 
मराठीत मुतणे 
मराठीत पिणे मराठी अश्रु काढणे
मराठीत रोगी होणे मराठीत भोगी होणे 
मराठीत उपभोगी होणे मराठीत योगी होणे
मराठीत उपयोगी होणे मराठीत खेळणे मराठीत चोळणे
मराठीत खुळे होणे
मराठीत लुळे होणे
मराठीत चरणे मराठीत हरणे 
मराठीत ऊठणे मराठीत मुठळ्या मारणे
मराठीत धरणे मराठीत करणे मराठीत मरणे
मराठीत धावणे मराठीत लावणे मराठीत चावणे
मराठीत हसणे मराठीत बसणे मराठीत डसणे
मराठी वेश करणे 
शुद्ध मराठी द्वेष करणे 
मराठीत माया लावणे 
मराठीत काया लावणे
मराठीत जीभेच्या भवानीला धार काढणे
मराठीत ऊडणे मराठीत बुडणे 
मराठीत पडणे मराठीत लंगडणे


मराठी असणे म्हणजे खांद्यावर शुद्ध मराठी ओझे वाहणे
मराठी असणे म्हणजे शुद्ध मराठी सुळ्यावर लटकणे
मराठी असणे म्हणजे शास्वत काळापासून
कपाळावर मराठी जखम घेउन हिंडणे


मराठी असंणे म्हणजे
मराठीत असणे


म्हणजेच मराठीत नसणे


मराठी असणे म्हणजे अमृताशी पैजा जिंकणाऱ्या 
आयसीयूत व्हेंटीलेटवर टिकलेल्या भाषेत


दुख:स्वप्न पाहणे


(१२ जानेवारी २०१०)

No comments: