Thursday, April 21, 2011

समकालीन मराठी समीक्षा: काही प्रश्न सचिन केतकर

re
तुमच्या मते 


१) समीक्षा म्हणजे काय? समीक्षेच प्रयोजन काय व एकंदरीत साहित्य संसकृतीत समीक्षेचे कार्य काय?


२) स्वातंत्रोतर काळातली महत्वाची मराठी समीक्षा /समीक्षक/ ग्रंथ/लेख कोणते? व का?


३) इतर भारतीय भाषेत महत्वाची समीक्षा /समीक्षक/ ग्रंथ/लेख कोणते? का?


४) इंग्रजी सहित जगातल्या इतर भाषेत महत्वाची समीक्षा /समीक्षक/ ग्रंथ/लेख कोणते? का?


५) राजकिय भूमिकेतून लिहीलेली समीक्षा महत्वाची वाटते का?


६) ‘चळवळी’ आणि ‘समीक्षा’ मधल्या नात्या विषयी काय म्हणने आहे?


७) अनियतकालिक चळवळीतून समोर आलेल्या समीक्षेचे काय महत्व?


८) विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुढे आलेल्या पाश्चात्य ‘सैद्धान्तिक’ समीक्षेचे (Theory) 
   आजच्या मराठी समीक्षेत स्थान काय?


९) जागतिकीकरणाचा आणि समीक्षेचा काय संबंध आहे?


१०) स्वातंत्रोतर मराठी साहित्याच्या (१९४७-२०११) ईतिहासलेखना विषयी काय वाटतं?


११) तुम्हाला समकालीन मराठी कवितेच्या बाबतीत कोणता सैद्धान्तिक अभिगम/ दॄष्टीकोन योग्य वाटतो?


१२) तुमच्या लेखनावर समीक्षेचा/समीक्षकांचा प्रभाव आहे का? कोणत्या?


१३) मराठीत आजच्या पिढीच्या समीक्षेबद्दल काय वाटते? 


१४) एकंदरीत मराठी समीक्षेची बलस्थाने व उणीवा कोणत्या वाटतात?


१५)  साहित्याच्या भवितव्याचा आणि समीक्षेच्या दर्ज्याचा संबंध आहे काय? आहे तर कोणता/कसा?
ह्या प्रश्नांच्या निवडक उत्तरांना बडोद्याहून लवकरच प्रकाशित होणार्या ’उंट’ ह्या अनियतकालिकात स्थान देण्यात येईल.


उत्तर sachinketkar@gmail.com हया पत्यावर किंवा
डॊ. सचिन केतकर, असोसीयट प्रोफ़ेसर इन ईंगलीश, फ़ेकलटी ओफ़ आर्ट्स, द महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी, बदोदे, गुजरात,
३९०००२ ह्या पत्त्यावर पाठवावे.